मूर्तिजापूर, (ता.प्र.). भारतीय कापूस महामंडळाअंतर्गत सीसीआयद्वारा ओम जिनींग ॲन्ड प्रेसिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुर्तिजापूर ते भटोरी मार्गावर असलेल्या ओम जिनींग ॲन्ड प्रेसिंग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली असून ओम जिनिंग ॲन्ड प्रेसिंग चे संचालक ॲड.अविन अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्यामसुंदर अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव रितेश मडके,सीसीआय सेंटरचे अधिकारी अमित कोहळे, राजू अरोरा यांच्या उपस्थितीत शेतकरी गजानन काकडे,राजू ठाकरे, प्रदीप भोरे,प्रशांत बोळे,सुनील पुंड,शंकर ठाकरे,अनुप भोरे यांच्याकडून कापूस खरेदी करून सुरुवात करण्यात आली.ॲड.अविन अग्रवाल यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे व इतर शेतकऱ्यांचे शाल, पुष्पगुच्छ ,पेडे भरवून स्वागत केले. बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपला कापूस आणला होता. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांनी कपास किसान या मोबाईल ॲप द्वारा स्वतःची नोंदणी करून घ्यावी व कपास किसान ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी जमिनीची नोंदी अद्ययावत महसूल प्राधिकरणाने योग्यरीत्या प्रमाणित केलेले पीक लागवडीची नोंद व यात आधार कार्ड फोटो दिलेल्या कालावधीत स्वतःची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन ओम जिनींग अँड प्रेसिंग चे संचालक ॲड.अविन अग्रवाल यांच्यावतीने करण्यात आले आहे.