मूर्तिजापूर,ता.१२ : नागपूरचे रमण सायन्स सेंटर व अकोल्याच्या शिक्षण विभागाच्या वतिने आयोजित फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचा लाभ येथील श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला.
प्रदर्शनीच्या बस चे आगमन विद्यालयाच्या प्रांगणात झाल्यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा लांडे यांनी फित कापून केले.
विज्ञान प्रतिकृती युक्त बसचा स्वागत समारंभ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.
प्राचार्य विलास खाडे यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला प्रमुख आतिथी म्हणून म्हणून विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र भास्कर, तालुकाध्यक्ष देवानंद मुसळे, प्रा. सुधाकर गौरखेडे , पर्यवेक्षक श्याम कोल्हाळे, रमन सायन्स सेंटर चे तंत्रज्ञ अजमिरे, राठोड, बानते उपस्थित होते .
यावेळी विद्यार्थांना विज्ञानाचे महत्व पटवून देण्यात आले व बसमधील विज्ञान प्रतिकृती व प्रयोगांबाबत माहिती देण्यत आली. सूत्रसंचालन मोहन विघे यांनी केले. प्रशांत घोडे यांनी आभार मानले. शिक्षक , प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.