निवडणूक निरीक्षकांची मूर्तिजापूर पालिकेला भेट
मूर्तिजापूर,ता.१२ : राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४/११/२०२५ ला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असून त्या अनुषंगाने तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू होऊन निवडणुक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार आज निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी येथील नगर पालिकेला भेट देऊन निवडणूक कामकाज पूर्वतयारी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा बोबडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नीलेश जाधव, शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव उपस्थित होते. मा. प्रमोद गायकवाड यांनी स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष इत्यादी ठिकाणी भेट देऊन निवडणूक कामकाजाची पाहणी केली व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सोबत कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता इत्यादी महत्वाचे विषयांवर चर्चा करून त्यांनी समाधान व्यक्त केले.