मूर्तिजापूर,ता.१३ : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आदर्श आचार संहितेचे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने  स्थाई पथक (SST पथक )गठीत करण्यात आले असून आज सकाळी  स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ४ आसरा फाटा नॅशनल हायवे मुर्तिजापूर यांनी वाहन क्र . MH ३१ CR ८६१९  वाहन चालक योगेश अनिल कनोजे यांच्या कडून रु. २,३०,३००/- रोख रक्कम जप्त केली. सदर कार्यवाही ही पथक प्रमुख चंदू महादेव तायडे व त्यांचे पथकातील इतर सर्व कर्मचारी यांनी केली. याबाबत  सदर रक्कम ही कशाबाबत व कुठून आणली याबाबत वाहन चालकाने पुरावे सादर न केल्यामुळे सदर रक्कम स्थिर सर्वेक्षण पथकाने पंचनामा अहवाल करून जप्त केली असून पुढील कार्यवाही मा . निवडणूक निर्णय अधिकारी तथा  उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी निलेश जाधव यांचे मार्गदर्शना खाली नोडल अधिकारी प्रसाद राठोड, वैभव ओहेकर, राजेश भुगुल आदर्श आचार संहिता अंमलबजावणी समिती  हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *