
मूर्तिजापूर,ता.१३ : नगराध्यक्ष आणि १२ प्रभागांतून २५ नगरसेवक निवडून देण्यासाठी होणाऱ्या मूर्तिजापूर पालिकेच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी केवळ
एक नामांकन दाखल झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी दिली..
सोमवार (ता.१०) पासून सोमवार (ता.१७) दुपारी ३ वाजेपर्यंत नगर पालिका कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत, मात्र सुरुवातीचे तीनही दिवस निरंक ठरले व आज प्रभाग क्रमांक ९ मधील इमाव महिला उमेदवारासाठी राखीव नगरसेवकाच्या जागेसाठी पलक विकी भावनानी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित व्हायचे असल्यामुळे सर्वच इच्छुक वेटींग वर आहेत. शेवटच्या तीन दिवसात नामांकन दाखल करण्याची लगबग वाढेल व निवडणूक यंत्रणेची तारांबळ उडेल आशी शक्यता व्यक्त होत आहे.