मूर्तिजापूर,ता.१४ : नगराध्यक्ष आणि १२ प्रभागांतून २५ नगरसेवक निवडून देण्यासाठी होणाऱ्या मूर्तिजापूर पालिकेच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी
६ नामांकन दाखल झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी दिली..
सोमवार (ता.१०) पासून सोमवार (ता.१७) दुपारी ३ वाजेपर्यंत नगर पालिका कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत. आज नगराध्यक्ष पदासाठी सुनील पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांनी प्रभाग १२ ब मध्ये नगरसेवक पदासाठीही अर्ज दाखल केला. नगरसेवक पदासाठी प्रभाग १ अ मध्ये आरती अंतगत बोरकर, ५ ब मध्ये सायना परवीन तफझ्झूल खान यांनी २, शायनाबी तस्लीम खाँ यांनी १ अर्ज दाखल केला.